मुख्य वीज वाहिनीचा तार अंगावर पडून 2 बैल जागीच ठार

जिंतूर/ प्रतिनिधी

मुख्य वीज वाहिनीचा तार अंगावर पडून दोन बैल जागीच ठार झाल्याची घटना जिंतूर तालुक्यातील रेपा येथे आज बुधवारी सकाळी 10 च्या सुमारास घडली.याबाबत अधिक माहिती अशी की जिंतूर तालुक्यातील रेपा येथील शेतकरी वसंत मुंजाजी मस्के यांचा सालगडी बैलगाडी घेऊन शेताकडे जात होता. सदर बैलगाडी ही गावातील नदी पार करून पलीकडच्या शिवारात जात असताना यावेळी अचानक मुख्य वीजवाहिनीचा तार तुटून बैलाच्या अंगावर पडल्याने दोन्ही बैल जागीच ठार झाले. सालगड्याने तात्काळ बैलगाडीतून उडी मारल्याने तो विजेच्या धक्क्यापासून वाचला. दोन्ही बैल दगावल्याने शेतकरी वसंत मस्के यांचे जवळपास सव्वा लाखाचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन, महावितरणचे अधिकारी व पशुवैद्यकीय दवाखान्याच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.महावितरण प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकऱ्याचे दोन्ही बैल दगावले आहेत. सदर शेतकऱ्याला शासनाकडून तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *