जैन वाचनालयात महात्मा गांधी वेशभूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण

सहसंपादक/मनोज टाक

बोरी येथील कै. जयकुमारजी जैन सार्वजनिक वाचनालयाच्या 23 व्या वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या महात्मा गांधी वेशभूषा स्पर्धा 2022 चे बक्षीस वितरण मंगळवार दिनांक 15 रोजी करण्यात आले .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मीना जैन होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक रमेश मुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वसंत मुळे ,मा.जि.प.सदस्य पंडितराव घोलप, बोरी सोसायटीचे संचालक अनंतराव चौधरी, सामाजिक कार्यकर्ते दिनकर चौधरी यावेळी उपस्थित होते. बालदिनाचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीस पंडित नेहरू यांच्या प्रतिमेचे मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. पवन ओझा ,बालप्रसाद सोमानी, दीपक राजुरकर, सूर्यप्रकाश सोनी, नेमीनाथ जैन यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ व ग्रंथ भेट देऊन स्वागत केले. ग्रंथपाल नेमिनाथ जैन यांनी प्रास्ताविक केले .2 ऑक्टोबर रोजी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, 14 अंगणवाडीतील 34 विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. या स्पर्धेत पहिले पाच विजेते कृष्णा संतोष ठमके, पियुष पुरुषोत्तम सोमानी ,नंदन उमेश नवाळ, स्वर्णिम अभिजीत चौधरी व श्रेयस नंदूराम शिंपले यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले .वेशभूषा स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना डिजिटल प्रमाणपत्र देण्यात आले. त्याचप्रमाणे स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल 12 अंगणवाडीताईंना प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. बुलढाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक रमेश मुळे, सहायक पोलीस निरीक्षक वसंत मुळे, मा.जि.प.सदस्य पंडितराव घोलप, दिनकर चौधरी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.जैन वाचनालयाने घेतलेल्या या स्पर्धेचे सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कैलास घादगिणे यांनी केले तर पवन ओझा यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमास अंगणवाडीताई मदतनीस व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *