पत्रकार अब्दुल हफीज बागवान यांना महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती प्रेस कार्ड मिळाल्याबद्दल सत्कार

हिंगोली प्रतिनिधी शेख खाजा

अब्दुल हफीज बागवान हे हिंगोली जिल्हयातुन मागील 11 वर्षा पासुन सत्यलेख या नावाने साप्ताहिक पेपर नियमीत चालवीत असुन त्याची दखल घेत हिंगोली जिल्हा माहिती कार्यालय व महाराष्ट्र शासनाने त्यांना दि. 27 ऑक्टोबर 2022 रोजी अधिस्वीकृती कार्ड मंजुर करुन जिल्हा माहिती कार्यालय हिंगोली च्या माध्यमाने सत्यलेख पेपर चे संपादक अब्दुल हफीज बागवान यांना महाराष्ट्र शासनाकडून अधिस्वीकृती कार्ड हस्ते प्रदान करण्यात आली आहे. राज्याचे माहिती व जनसंपर्क महासंचालनालय मुंबई कार्यालया मार्फत महाराष्ट्र राज्यातील सक्रीय वृतपत्र प्रतिनिधींना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते यावर्षी हिंगोली जिल्ह्यातून सत्यलेख पेपर चे अब्दुल हफीज बागवान यांचा अर्ज शासनाने मंजूर केल्याने शुक्रवारी हिंगोली येथे अधिस्वीकृती पत्रिका कार्ड देण्यात आले त्याबद्दल ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशनच्या हिंगोली जिल्हाच्या वतीने पत्रकार अब्दुल हफीज बागवान चा सत्कार करण्यात आला यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष व माजी नगरसेवक अब्दुल हकीम बागवान, जिल्हा सेक्रेटरी बाबा भाई तांबोली , जिल्हा जनरल सेक्रेटरी हाश्मी सय्यद अख्तर, शहर अध्यक्ष शेख मोईज बागवान, जिल्हा उपाध्यक्ष शेख अकबर कुरेशी, तालुकाध्यक्ष शेख मुशीर आतार, शेख मतीन बागवान टेलर, प्रेस रिपोर्टर पठाण सलीम खाान सह मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *