रीडज येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न
सहसंपादक/मनोज टाक
जिंतूर तालुक्यातीलबोरी जवळील रिडज येथे मा. आ.श्री.रामप्रसादजी बोर्डीकर यांच्या वाढदिवसानिमित्त रीडज येथील जगदंबा मित्र मंडळ यांनी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अशोकराव बाबाराव खापरे होते तर कार्यक्रमाला हरिभाऊ रोकडे,शिवाजी अशोक खापरे, एकनाथ मुटकुळे, वसंतमुटकुळे,आसाराम खापरे, सतीश खापरे यांची प्रमुख उपस्थिती होती.अशोकराव खापरे यांनी रक्तदानाचे महत्त्व पटवून अध्यक्ष समारोप केला. गावातील 51 रक्तदात्यांनी रक्तदान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. नांदेड येथील मॉं. जिजाऊ ब्लड सेंटर यांच्या सहकाऱ्यांनी हे रक्तदान शिबिर उत्साहात पार पडले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विक्रम खापरे यांनी केले. शिवाजी लिंबाजी खापरे,गोपाळ खापरे,भगवान राऊत,राजू नारायण खापरे, गोविंद खापरे, छत्रपती खापरे, या नवयुवकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.यावेळी जगदंबा मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी,सदस्य,गावकरी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते