आडगाव बाजार येथील दलित समाजाच्या स्मशानभूमी रस्त्याच्या मागण्या उपोषणाला यश

सहसंपादक/मनोज टाक

जिंतूर तालुक्यातील आडगाव बाजार येथील दलित वस्तीच्या स्मशानभूमीसाठी आज जिंतूर तहसील कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते व इतर नागरीक मिळून तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले व त्यांनी आज गुरुवार २० ऑक्टोंबर 2022 रोजी दलित वस्तीच्या स्मशानभूमी येथील सिमेंट रस्ता करून द्यावे याकरिता तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सकाळी दहा वाजता पासून सुरू करण्यात आले होते. त्यांच्या उपोषणाला आडगाव बाजार येथील ग्राम विकास अधिकाऱ्यांनी भेट देऊन त्यांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या व रोड स्मशान भूमी कडे जाणारा रोड तात्काळ मजबुतीकरण व दोन महिन्यात सिमेंट रोड करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यामुळे सामाजिक कार्यकर्ते व गावकऱ्यांनी उपोषण मागे घेतले या उपोषणात दीपक रामकिशन डोके, दिनकर रामभाऊ डोके, देविदास लिंबाजी ढोके, बबन अन्ना रवी ढोके, रमेश ढोके, गंगाधर ढोके, मनोहर डोके, दीपक ढोके, सहित पठाण, अमोल डोके आदी गावकरी उपोषणाला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *