लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील व माजी खा.शिवाजीराव माने साहेब यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची घेतली भेट

हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्याकरिता जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे आणि साठवण तलाव करणे गरजेचे असून शासन स्तरावर प्रलंबित असलेले १४० प्रस्ताव तातडीने मार्गी लावून त्याकरिता निधी मंजूर करावा, अशी मागणी हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील व माजी खा.शिवाजीराव माने साहेब यांनी महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली

हिंगोली जिल्हा सिंचन अनुशेष्याच्या बाबतीत अत्यंत मागास असून यामुळे जिल्ह्यातील सिंचनाखालील जमिनीचे क्षेत्र खूप कमी आहे. दरवर्षी जिल्ह्याचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी प्रस्ताव मागविले जातात परंतू त्यावर काहीच ठोस कार्यवाही करण्यात येत नाही. याबाबत पुढाकार घेऊन महामहिम राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्राद्वारे विनंती करून हिंगोली जिल्ह्याचा सिंचन अनुशेष दूर करण्यासाठी विशेष बैठक आयोजित करावी अशी मागणी केली होती. यावेळी झालेल्या बैठकीत हिंगोली जिल्ह्याच्या सिंचन अनुशेष्याची आणि भौगोलिक क्षेत्राची परिपूर्ण माहिती दिली ते, हिंगोली जिल्ह्यात हनुमंतराव शिफारसी नुसार कळमनुरी आणि औंढा हे दोन तालुके अवर्षण प्रवण क्षेत्रात येतात तसेच जिल्ह्याच्या भौगोलिक क्षेत्रात गोदावरी खोऱ्याअंतर्गत कयाधू, पूर्णा, पैनगंगा व मध्य गोदावरी हे उपखोरे विभागलेले आहेत एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ४०४५९३ हेक्टर एवढे क्षेत्र लागवडीखाली आहे. तर प्रकल्पीय सिंचन क्षमता ८४२५८ हेक्टर असून निर्मित सिंचन क्षमता ५८१०८ हेक्टर एवढी आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यात कोल्हापुरी बंधारे आणि साठवण तलाव करण्याचे एकूण १४० प्रस्ताव शासन दरबारी मान्यतेसाठी प्रलंबित आहेत. याकरिता २३० कोटी निधी आवश्यक आहे. परंतु अद्याप यावर कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही. राज्यपालांच्या घेतलेल्या भेटीत सिंचन अन्यशेष्याच्या अनुषंगाने अनेक विषयावर चर्चा केली. राज्यपाल महोदयांनी यास सकारात्मक प्रतिसाद देत तातडीने अनुशेष भरून काढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *